नागोठणे : भरधाव वेगात अवजड माल भरलेल्या ट्रेलरने समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला धडक दिल्याने रुग्णवाहिकेचा चालक गंभीर झाल्याने अधिक उपचारासाठी त्याला पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे. मुंबई - गोवा महामार्गावर येथील कामतगोविंदा हॉटेलनजीक काल गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान हा अपघात झाला. महमद हुसेन कोरतकर हा रु ग्णवाहिकेचा चालक नागोठणे येथून रुग्णाला आणण्यासाठी दवाखान्यात जात असताना हा अपघात घडला. अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}