Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका, पोलिसांना रात्री सायरन वाजविण्यावर बंदी!

By admin | Updated: August 6, 2014 03:21 IST

रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस खात्यासह इतर शासकीय वाहनांना असलेले सायरन किंवा मल्टीटोन हॉर्न रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये वाजविण्यावर र्निबध घालण्यात आले आहेत.

बुलडाणा : रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस खात्यासह इतर शासकीय वाहनांना असलेले सायरन किंवा मल्टीटोन हॉर्न रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये वाजविण्यावर र्निबध घालण्यात आले आहेत. या वाहनांची ध्वनिमर्यादा तपासण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणा:या वाहनांवरील हॉर्न काढण्याच्या सूचनाही शासनाने प्रादेशिक परिवहन अधिका:यांना दिल्या आहेत.
रुग्णवाहिकांचे वाहनचालक अनेकवेळा हॉर्नचा दुरुपयोग करून शहरात वाहन सुसाट दामटतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच, शिवाय अपघाताचा धोकाही वाढतो. पुण्यातील एका संस्थेने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर शासनाने यासंदर्भात पावले उचलली. 
त्यानुसार रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आपत्ती निवारण वाहने, तसेच पोलीस खात्यासह इतर शासकीय वाहनांवर लावण्यात येणा:या सायरनसाठी शासनाकडून नियमावली निश्चित करण्यात आली आहे. 
त्यानुसार सायरन व मल्टीटोन 
हॉर्न बसविलेल्या वाहनांनी निर्धारित 
ध्वनिमर्यादेतच त्याचा वापर करावा, 
पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिका:यांनी त्याची तपासणी करावी, या वाहनांनी 
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास 
वाहनांवरील सायरन काढून कारवाईदेखील करावी, अशा सूचना देण्यात आल्या 
आहेत. (प्रतिनिधी)
 
च्शासन आदेशानुसार, सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या शासकीय वाहनांनी कोणत्याही क्षेत्रमध्ये रात्री 1क् ते सकाळी 6 या वेळेमध्ये हॉर्नचा वापर करू नये. आपत्कालीन परिस्थितीत शहराच्या हद्दीबाहेरील रस्त्यांवर हॉर्नचा वापर करता येईल. 
च्उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या अॅम्बुलन्सवर लावण्यासाठी योग्य स्टीकर द्यावे. रुग्णांच्या नातेवाइकांकडून मागणी आल्याशिवाय रुग्णवाहिकांनी सायरन व मल्टीटोन हॉर्नचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.