पेण : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पेण - रामवाडी येथे तीन गुंठे जिल्हापरिषदेच्या मालकीच्या
जागेत भव्य स्मृतिभवन उभे रहणार आहे. या भवनासाठी 25 लाख खर्च होणार आहे. शनिवारी या स्मृतिभवनाचा भूमीपूजन समारंभ पेण आ. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाला.
पेण रामवाडी बसस्थानका शेजारील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत तीन गुंठे क्षेत्रवर हे स्मृतिभवन उभे रहात आहे. आज सकाळी 11.क्क् वाजता या भूमीपूजनाचा o्रीफळ आ. धैर्यशील पाटील, पेण न. पा. नगरसेवक पांडुरंग जाधव व जोशी गुरुजीच्या शुभहस्ते वाढविण्यात आला.
या प्रसंगी शेकाप सहचिटणीस भास्कर पाटील, संतोष अडसुळे, विजय धोत्रे, प्रभाकर गायकवाड, राजेश कांबळे, कैलाश जाधव यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गावोगावचे प्रमुख अनुयायांसह शेकाप कार्यकत्र्याची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन कार्यक्रमाप्रसंगी समाज बांधवांना जागेची अडचणीबाबत सहकार्य करणारे महादेव दिवेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवीत संतोष अडसुळे यांनी 7 गुंठे जागा
विनामूल्य उपक्रम करुन दिली असून मुंबई - गोवा महामार्गालगत पशुसवंर्धन कार्यालयाशेजारी असणा:या या जागेमुळे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच मोठं ज्ञानपीठ भविष्यात पेणमध्ये उभे राहण्याची सुवर्णसंधी बौध्द समाजाला लाभली आहे. (वार्ताहर)