अहमदनगर जवखेडा येथिल दलित जाधव कुटूंबाच्या हत्याकांडाच्या निषेर्धात छत्रपती-फुले-शाहु-आंबेडकरी सामाजिक संस्थेच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिका:यांना निवेदन दिले आहे. या मोर्चात शेकडो जण सहभागी झाले होते.
या हत्याकांडाची सीबीआय मार्फत चौकशी करणो, आरोपीना त्वरीत अटक करणो, साक्षीदारांना पोलिस संरक्षण देणो, विशेष सरकारी वकिलाच नियुक्ती करणो आदी मागण्या शिष्टमंडळाने निवेदनात केल्या आहेत.
निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांना पाठविण्यात आल्याची माहिती अनिल बागुल यांनी दिली. निवेदन दिल्यानंतर मोर्चातील नागरिकांना डॉ गिरीष लटके यांनी मार्गदर्शन केले आहे. मोर्चाला अपंग संस्थेचे भरत खरे यांनी पाठिंबा देवुन हत्यांकांडाचा निषेध केला आहे.
तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मुरबाडमध्ये कडकडीत बंद
मुरबाड / टोकावडे : अहमदनगर जिल्हय़ातील पाथर्डी तालुक्यात जवखेडे येथे दलित कुटुंबीयांचे तिहेरी हत्याकांड झाले. या निषेधार्थ बुधवारी मुरबाड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील आंबेडकरी कार्यकत्र्यानी या निषेधार्थ तहसीलदार सज्रेराव म्हस्के-पाटील व पोलीस निरीक्षक अशोक आम्ले यांना भीमराव भोईर, प्रभाकर अहिरे, रवींद्र देसले, शंकर गोहील, रमेश देसले यांच्यासह शेकडो कार्यकत्र्यानी पत्र दिल्यामुळे मुरबाडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलीस यंत्रणोने अगोदरच चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मुरबाड शहर, म्हसा, धसई, टोकावडे व सरळगाव परिसरांतील व्यापा:यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो कार्यकत्र्यानी मुरबाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून पाथर्डी येथील दलित हत्याकांडात सामील असणा:या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, त्यासाठी त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा
कोळसेवाडी : 15 दिवस उलटून गेले तरी तिहेरी हत्याकांडातील आरोपींना अद्याप पकडण्यात आले नाही. राज्यामध्ये दलितांवरील अत्याचार वाढीस लागले आहेत. पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अन्याय कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार किरण सुरवसे यांना देण्यात आले आहे.