Join us  

आंबेडकरी अनुयायींची पावले चैत्यभूमीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:16 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येऊ लागले आहेत.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येऊ लागले आहेत. अनुयायींच्या कपड्यांचा रंग विशेषत्वाने निळा व पांढरा असल्याने, या परिसरात सर्वत्र प्रकर्षाने निळा व पांढरा रंग दिसू लागला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर व पोस्टर लावण्यात आले आहेत. लाखोंच्या संख्येने येणाºया अनुयायींच्या सोयीसाठी महापालिकेने अनेक सुविधा पुरविल्या आहेत. त्याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांनी सुविधा पुरविल्या आहेत.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर जणू निळे वादळ धडकते. त्यामुळे गर्दीचा भाग होण्याऐवजी अनेक अनुयायी६ डिसेंबरपूर्वी मुंबईत येण्याला प्राधान्य देतात. अशा अनुयायींना वास्तव्याची व जेवणाची सुविधा पुरविण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेली लाखो अनुयायींची गर्दी लक्षात घेऊन, विविध राजकीय पक्षांतर्फे राजकीय सभांचे आयोजन केले जाते. त्यासाठी व्यासपीठ उभारणे व इतर अनुषंगिक बाबी करणे या प्रक्रियेला वेग आला आहे.>शिवाजी पार्क मैदानात विशेष सुविधाअनेक अनुयायी ६ डिसेंबरपूर्वी मुंबईत येण्याला प्राधान्य देतात. अशा अनुयायींना वास्तव्याची व जेवणाची सुविधा पुरविण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.देशाच्या कानाकोपºयातून येणाºया अनुयायींना कोणत्याही प्र्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे लक्ष ठेवण्यात येत आहे.>अनेक अनुयायी ६ डिसेंबरपूर्वी मुंबईत येण्याला प्राधान्य देतात. अशा अनुयायींनी शिवाजी पार्कवर गर्दी केली आहे. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शिवाजी पार्क मैदानात त्यांच्या जेवणासह आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.