Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन रखडले

By admin | Updated: July 10, 2014 23:55 IST

ऐरोलीमध्ये आंबेडकर भवनचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये आंबेडकर भवनचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  मुख्यालयप्रमाणो या कामास प्राधान्य दिले नसल्याचा आरोपही करण्यात आला. 
नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर  15 मध्ये आंबेडकर भवन बांधण्याचे काम  एप्रिल 2क्11 मध्ये सुरू केले आहे. 17 कोटी 44 लाख रूपयांना  ठेका देण्यात आला आहे. एप्रिल 2क्13 ला कामाची मुदत संपली आहे. मुदत संपून एक वर्ष झाल्यानंतर अद्याप काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. याच कामासोबत सुरू झालेले महानगरपालिकेचे मुख्यालय पूर्ण झाले. परंतु सर्वाच्या अस्मितेचा विषय असलेल्या आंबेडकर स्मारकाच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होवू लागले आहे. भवनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचा ठराव आज स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. 1 कोटी 35 कोटी रूपयांचा प्रस्ताव सर्वसहमतीने मंजूर केला. परंतू यावेळी चर्चा करताना कामाच्या गतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
स्थायी समितीमध्ये शिवसेनेच्या मनोज हळदणकर यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. बांधकामाची मुदत संपली तरी अजून काम पूर्ण होवू शकले नाही. डिसेंबर 2क्13 मध्ये सर्वसाधारण सभेत चर्चा झाली तेव्हा 8 महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतू प्रत्यक्षात मात्र अद्याप खूप काम शिल्लक असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवराम पाटील यांनी प्रशासनावर टीका केली. ठेकेदाराविषयी आम्ही सुरवातीसच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतू तेव्हा कोणी ऐकले नाही. मुख्यालय पूर्ण करण्यासाठी सर्वानी घाई केली. परंतु राज्यभर चर्चा झालेल्या या स्मारकाच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 
मुख्यालयाप्रमाणो लक्ष द्यावे
महापालिकेच्या मुख्यालयाचे काम करण्यासाठी अभियंत्यांची फौज होती. अधिकृत व इतरही काहीजण येथे तळ ठोकून होते. मुख्यालयात तळ ठोकणारांनी आंबेडकर भवनचे काम पूर्ण करण्यासाठी तळ का ठोकला नाही असा प्रश्न शिवराम पाटील यांनी उपस्थित केला. त्यांचा रोख एक बडय़ा  नेत्याकडे असल्याचे लक्षात आल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या होत्या. 
 
भूखंडाचे क्षेत्रफळ - 575क्
कामाची रक्कम - 17 कोटी 44 लाख 
कामाची सुरुवात - 6 एप्रिल 2क्11
काम पूर्ण करण्याची तारीख - 5 एप्रिल 2क्13