Join us

चक्क विमानातील बसायची सीटच केली गायब; सोशल मीडियात फोटो व्हायरल

By मनोज गडनीस | Updated: January 11, 2024 17:41 IST

इंडिगोच्या आणखी एका विमानतली सीट गायब; संतापलेल्या प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

मुंबई - विमानात बसायला गेल्यानंतर सीटच जागेवर नसण्याच्या दोन घटनांमुळे चर्चेत आलेल्या इंडिगो कंपनीच्या ताफ्यातील आणखी एका विमानात असाच प्रकार घडला आहे. एका महिला प्रवाशासोबत हा प्रकार घडल्यानंतर इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे. रया घोष असे या महिला प्रवाशाचे नाव असून तीने ट्विटरद्वारे आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. मात्र, ती इंडिगोच्या कोणत्या विमाने कुठून कुठे जात होती याचे तपशील तिने दिलेले नाहीत. 

इंडिगोच्या विमानात प्रवेश केल्यानंतर जेव्हा आपल्या जागेवर बसण्यासाठी गेली तेव्हा तिथे सीटच नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब तिने केबिन क्रूच्या निदर्शनास आणून दिली. तीची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली. मात्र, तिने त्या जागेचा फोटो काढून तो समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.