Join us
Daily Top 2Weekly Top 5

दूध विक्रीस सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत परवानगी द्या- संजय निरुपम यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:07 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला असून, निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यातील सर्व किराणा, ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला असून, निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू राहण्याबाबत नियम करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे दूध व्यवसायासाठीदेखील सकाळी 7 ते 11 ही वेळ ठरविण्यात आली आहे. मात्र, संध्याकाळचे दूध वाया जाते आणि याचा मोठा फटका दूध व्यावसायिकांना बसत असून, सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत दूध विकण्यास परवानगी द्यावी, असे निरुपम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

-------------------- -- -- --