ठाणे, दि. १८ - अंबरनाथ येथील काकडोली गावातील ग्राम पंचायतीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रेंशिंकान कराटे व इवाऊ तमात्सू फाऊंडेशन जपान यांच्यातर्फे शालेय शिक्षणासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.रेंशिनकान कराटेचे प्रमुख इवाऊ तमात्सू भारत भेटीवर आले असता त्यांनी ग्राम पंचायतीच्या शाळेतील व कराटेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना शिक्षणाचे, खेळाचे व आत्मसंरक्षणाचे महत्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांचे मनोगत जाणून घेतले. रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी तमात्सू यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन रेंशिनकान कराटेचे महाराष्ट्रातील प्रशिक्षक ब्रिजेश प्रसाद व अयुब इब्राहिम यांनी केले होते. तसेच त्यांचे सहकारी संतोष सर, नवीन सर व दत्ता टेके सर इत्यादी सहकारी कराटे प्रशिक्षकांनी मदत केली.