Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा कोविड सेंटरसाठी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:07 IST

आमदार भारती लव्हेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शहाजी राजे क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे ...

आमदार भारती लव्हेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शहाजी राजे क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणेसह कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी महापालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे केली आहे.

सध्या कोविडमुळे पूर्ण मुंबईत परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली असून के (पश्चिम) वॉर्ड तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला आहे. येथे रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी वर्सोवा मतदारसंघातील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा कोविड सेंटरसाठी त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा खूप मोठी असून मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे. यासाठी येथे तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर उभारावे जेणेकरून मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्णांवर या ठिकाणी चांगले उपचार होऊ शकतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

----------- -- -- - ------ -------