Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा घोडा यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

By admin | Updated: June 1, 2015 22:47 IST

येथील सर्वपक्षांच्या वतीने आमदार कृष्णा घोडा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार आनंद ठाकूर,

डहाणू : येथील सर्वपक्षांच्या वतीने आमदार कृष्णा घोडा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार आनंद ठाकूर, आमदार मनिषा चौधरी, माजी आमदार विवेक पंडीत, केदार दिघे, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे,जनता बँक अध्यक्ष भरत राजपुत, सभापती चंद्रकला आंबात, जिल्हापरिषद उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनिता कोरे, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, संपर्क प्रमुख सागर, तालुका प्रमुख संतोष वझे, अनिल गावड, शशिकांत बारी, रमेश कर्नावट, शमिपिरा, अमित घोडा, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, डहाणू पंचायत समिती सदस्य, सरपंच सर्व पक्षिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.आमदार कृष्णा घोडा यांना सार्वजनिक कामाचा प्रचंड ध्यास होता. त्यांच्या निधनामुळे त्यांची अपूर्ण कामे पूर्णत्वास नेणे ही सर्वांची जबाबदारी असून तिच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे मत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त करून त्यांचे पुत्र अमित घोडा यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)