Join us

रेल्वेसंबंधी सर्व समस्या मार्गी लागणार -सिन्हा

By admin | Updated: August 24, 2014 01:37 IST

रेल्वेसंबंधी सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी मीरा रोड येथे दिली.

भाईंदर : रेल्वेसंबंधी सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी मीरा रोड येथे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसारच आपण मुंबई उपनगरीय रेल्वेसंबंधी समस्यांची माहिती घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.  उपनगरीय रेल्वेसाठी भविष्यात विशेष तरतूद करण्याची हमी देऊन त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षेप्रमाणोच रेल्वे प्रशासनाचा कारभार चालला पाहिजे, असे मत व्यक्त केले. गणोशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणासाठी डबल डेकर एसी प्रीमियम गाडी शुक्रवारपासून सुरू केली आहे. ही गाडी र}ागिरीर्पयत नेण्यासाठी मध्य रेल्वेच्याच लोको पायलटचे काम असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले. तसे असतानाही 
मध्य रेल्वेचा लोको पायलट बी. सी. सिंगने रोहा स्थानकातून गाडी 
पुढे नेण्यास नकार दिल्याच्या 
घटनेवर सिन्हा यांना छेडले असता त्यांनी यावर तोडगा काढण्याचे सांगत पत्रकार परिषद गुंडाळून काढता पाय घेतला. 
सिन्हा यांनी रेल्वे स्थानकांवरील समस्यांची पाहणी करून त्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.