खालापूर : तालुक्यातील वावोशी भागात गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरणाचे जाळे प्रचंड वाढले असताना स्थानिक भूमिपुत्रंना परिसरातील कारखान्यांमध्ये रोजगार मिळण्यात मोठय़ा अडचणी येत आहेत. त्यामुळे देशाचा आधारस्तंभ असलेल्या या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सेना कटिबद्ध असल्याचे मत सेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे यांनी वावोशी येथे बोलताना दिले. सेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला असून वावोशी भागातील गावात प्रचाराला वेग आलेला आहे.
कर्जत मतदारसंघात सेनेने ग्रामीण भागातील गावागावामध्ये प्रचारावर अधिक भर दिला आहे. कार्यकर्ते गावागावामध्ये स्वतंत्र प्रचार करीत असताना उमेदवार पिंगळे हे देखील शेकडो कार्यकत्र्यासह ग्रामीण भागात प्रचार करीत आहेत. प्रचाराला कमी कालावधी असतानाही कार्यकत्र्याच्या आग्रहाखातर वावोशी भागात उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचाराला सुरु वात केली आहे . वावोशी येथील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या वेळी तालुकाप्रमुख संतोष विचारे, माजी सभापती एच़ आऱ पाटील, शांताराम हाडप, सुरेश कडव, जनार्दन थोरवे, आत्माराम पाटील, दिनेश घोंगे, भाऊ गायकवाड, सागर कर्णूक आदींसह शेकडो शिवसैनिक प्रचारात सामील झाले आहेत. प्रचारादरम्यान कार्यकत्र्यात उत्साह असून, त्यानिमित्ताने उमेदवार आणि पक्षाची निशाणी घराघरात पोहोचविण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत.
गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनी केला प्रचार सुरू
अलिबाग - अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार प्रकाश काठे यांच्या प्रचाराची सुरुवात गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केला. अलिबाग येथील सागाव मारुती मंदिरात श्रीफळ वाढविल्यानंतर उपस्थितांनी मारुतीचे दर्शन घेतले.
भाजपाने एक प्रचाररथ केला होता. आघाडी सरकारच्या धोरणांनी महाराष्ट्रातील जनतेचे कसे नुकसान केले, याची माहिती त्या रथावरील लावलेल्या बॅनरवर दिली होती. हा चित्ररथ येत्या 1क् दिवसांत मतदारसंघात फिरणार आहे. याप्रसंगी गोव्यातून आलेले उल्हास आसनोडकर, प्रकाश नाईक, दीपक राणो, भाजपाचे अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, उदय काठे, कांती जैन आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाने कोकणातील 15 मतदारसंघांतील जबाबदारी गोवा राज्यावर दिली आहे.
प्रशांत ठाकूर ठरताहेत तुल्यबळ
पनवेल - पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने नवखा उमेदवार दिला असल्याने ही बाब भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. त्यामुळे मतविभाजनाचा फटका कमळाला बसणार नसल्याचा अंदाज राजकीय वतरुळातून व्यक्त होत आहे. प्रचारातही धनुष्यबाण फारशा आघाडीवर दिसत नसल्याने त्याचा फायदा भाजपालाच होण्याची चिन्हे आहेत.
पनवेल विधानसभा मतदारसंघात पूर्वी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकमेकांना शह देत असत. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा नंबर लागत असे, मात्र टोलच्या प्रश्नावरून प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीवर पाणी सोडत काँग्रेसची साथ सोडली. कमळाकडून ठाकूर निवडणूक रिंगणात उतरले असून सध्या राज्यातही परिवर्तनाची लाट आहे. काँग्रेसविरोधी वातावरण, मोदीफिवर त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ठाकूर यांचे पारडे जड आहेच; शिवाय महायुतीचा काडीमोड झाल्याने सेनाही या मतदारसंघात रणांगणात उतरली आह़े मात्र पक्षाने वासुदेव घरत या नवख्या उमेदवाराला तिकीट दिले असून, त्यांचा जनसंपर्क तुलनेत कमी आहे. या ठिकाणी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांचे नाव चर्चेत होते, परंतु त्यांच्यावर जिल्हय़ातील सर्व मतदारसंघांतील प्रचाराची धुरा देण्यात आली आहे. दुसरा तुल्यबळ उमेदवार नसल्याने वासुदेव घरत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. (वार्ताहर)
च्प्रशांत ठाकूर यांच्या नावावर अनेक विकासकामे आहेत. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात त्यांनी या भागातील अनेक प्रश्न शासनदरबारी उपस्थित करून काहींची सोडवणूकही करून घेतली.
च्यांचा थेट राहुल गांधींशी संबंध असतानाही त्यांनी जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून काँग्रेसला रामराम ठोकला. टोलमुळे त्यांनी केलेला पक्षत्याग पनवेलकरांना अधिक भावला.