Join us
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये 17 टन ज्वालाग्राही गॅस पकडला

By admin | Updated: November 24, 2014 22:48 IST

ठाणो जिल्हय़ातील वसई येथील कॉन्फिडन्स गॅस फिलिंग एजन्सीला वितरीत करण्याचा अतिज्वालाग्राही 17 टन लिक्विड पेट्रोलियम गॅसचा टँकर पाठविण्यात आला होता.

अलिबाग : ठाणो जिल्हय़ातील वसई येथील कॉन्फिडन्स गॅस फिलिंग एजन्सीला वितरीत करण्याचा अतिज्वालाग्राही 17 टन लिक्विड पेट्रोलियम गॅसचा टँकर पाठविण्यात आला होता. मात्र तो परस्पर बंगलोर मधील स्नेहा पेट्रोलियम कंपनीकडे पाठविण्यात येत होता. हा टँकर खालापूर तालुक्यातील सावरोली बायपास रोडवर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पकडण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस नाईक भानुदास कराळे यांनी यश मिळविले आहे. 
11 लाख 1क् हजार 625 रुपये किमतीच्या 17 टन अतिज्वालीग्राही लिक्विड पेट्रोलियम गॅससह टँकर व अन्य ऐवज असा एकूण 29 लाख 11 हजार 125 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
अतिज्वालाग्राही लिक्विड पेट्रोलियम गॅसच्या या बेकायदा वाहतूक व चोरी प्रकरणी टँकर चालक नाना भाऊ चव्हाण (रा.दहिसर-ठाणो), जोगिंदर महू (रा.चेंबूर-मुंबई) व ललित यादव या तिघांवर खालापूर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन,
अटक करण्यात आली आहे. 
(प्रतिनिधी)