Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया गेली सुटीवर

By admin | Updated: June 20, 2014 23:18 IST

‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमधील कारकीर्दीस सुरुवात करणा:या आलिया भट्टला फुरसत नावाची गोष्टच माहीत नव्हती.

‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमधील कारकीर्दीस सुरुवात करणा:या आलिया भट्टला फुरसत नावाची गोष्टच माहीत नव्हती. 2क्14 हे वर्ष तर अधिक व्यस्ततेचे ठरण्याची चिन्हे दिसत होती. ‘हायवे’ आणि ‘टू स्टेटस्’ हे तिचे चित्रपट याच वर्षी रिलीज झाले असून, ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ हा चित्रपट येत्या 11 जुलै रोजी रिलीज होत आहे, अशा प्रकारे आलिया भट्ट व्यस्त असतानाच काही दिवसांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने तिला सक्तीचा आराम मिळाला. त्याचा फायदा घेत आलियाही आई सोनी राजदानसोबत फिरायला रवाना झाली. डोंगररांगात असलेल्या एका पर्यटनस्थळी सध्या ती सुटी ‘एन्जॉय’ करीत आहे. ‘तीन दिवस मी डोंगरद:यांत राहणार आहे,’असे टि¦टदेखील तिने केले आहे.