Join us

अक्षय्य तृतीयेला मुंबईकर सुसाट

By admin | Updated: May 10, 2016 03:02 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी दुचाकी आणि चारचाकी खरेदीला तुफान प्रतिसाद दिला.

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी दुचाकी आणि चारचाकी खरेदीला तुफान प्रतिसाद दिला. मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ६००हून अधिक वाहनांची नोंदणी झाली. वडाळा कार्यालयात २८ चार चाकी आणि ८४ दुचाकींची नोंद झाली आहे, तर ताडदेव कार्यालयात ३० चार चाकी आणि १९५ दुचाकींची नोंद झालीे. अंधेरी आणि बोरीवली कार्यालयांत एकूण २००हून अधिक वाहनांची नोंदणी झाली. अशा प्रकारे दिवसभरात ६००हून अधिक वाहनांची नोंद केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेत प्रशासनानेही विशेष व्यवस्था केली होती. (प्रतिनिधी)