Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयकुमार काळे यांचा उद्या सत्कार

By admin | Updated: December 23, 2016 03:04 IST

डोंबिवली येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार

ठाणे : डोंबिवली येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचा मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणेच्या वतीने शनिवार, २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सत्कार करण्यात येणार आहे.साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा ग्रंथसंग्रहालय ठाणे शाखेच्या वतीने सत्कार केला जातो. यंदा ठाणे जिल्ह्यातच डोंबिवलीनगरीत हे साहित्य संमेलन भरणार आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यावर ठाण्यात अशा प्रकारे मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. काळे यांचा प्रथमच सत्कार होणार असून त्यानिमित्ताने ते ठाणेकरांशी संवाद साधतील. या वेळी गझलसम्राट सुरेश भट यांच्या काही गझला प्रसिद्ध गझलाकार प्रदीप निफाडकर सादर करणार आहेत. इच्छुक ठाणेकरांनाही या वेळी संमेलनाध्यक्षांचा सत्कार करण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)