Join us
Daily Top 2Weekly Top 5

अकबरु द्दीन ओवेसीची मुंबईत सभा

By admin | Updated: September 12, 2014 01:08 IST

प्रक्षोभक भाषणामुळे प्रसिद्ध झालेले आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे नेते आ. अकबरुद्दीन ओवेसी शुक्रवारी मुंबईत येत असून नागपाडा येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई : प्रक्षोभक भाषणामुळे प्रसिद्ध झालेले आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे नेते आ. अकबरुद्दीन ओवेसी शुक्रवारी मुंबईत येत असून नागपाडा येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेच्या माध्यमातून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या सभेच्या तयारीसाठी पक्षाचे शिष्टमंडळ दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई व ठाणे परिसरात ओवेसी बंधूंची ही पहिलीच जाहीर सभा असून राज्यातील मुस्लीम बहुल विभागात उमेदवार उभे करण्याची घोषणा ओवेसी यांनी केली आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी इफ्तारसाठी मुंबईत येण्यास कायदा व सुव्यवस्थेच्या नावावर पोलिसांनी परवानगी नाकारली होती.एमआयएममुळे मुस्लीम मतांचे विभाजन होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर मुंबईतील मुस्लीम समाजात उत्तर भारतीयांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे दक्षिणेतील एमआयएम व ओवेसी बंधूंना मुंबईत यश मिळण्याची शक्यता कमी असल्याचा दावा काँग्रेसच्या गोटातून होत आहे. (प्रतिनिधी)