Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या गायन स्पर्धेत अजित मोरये यांची बाजी

By admin | Updated: January 23, 2017 05:58 IST

ज्येष्ठ नागरिकांसाठी देशपातळीवर आयोजित केलेल्या गीतगायन स्पर्धेत मुंबईतील अजित मोरये यांनी प्रथम क्रमांक पटकावत

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी देशपातळीवर आयोजित केलेल्या गीतगायन स्पर्धेत मुंबईतील अजित मोरये यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. याबद्दल नुकतेच त्यांना ज्येष्ठ नागरिक एकता समिती बोरीवली (पूर्व) आणि दहीसर मुंबई यांच्या वतीने गौरविण्यात आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली परिसरात मकर संक्रांतीचे औचित्य साधून स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा नुकताच आयोजित केला होता. या प्रसंगी मोरये व काही निवडक ज्येष्ठ नागरिकांनी सुरेल गीते गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. (प्रतिनिधी)