Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाची ऐशी-तैशी

By admin | Updated: November 14, 2014 23:00 IST

देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचा गवगवा केला जात असला तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेने त्याला हरताळ फासला आह़े

डोंबिवली - देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचा गवगवा केला जात असला तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेने त्याला हरताळ फासला आह़े येथील महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग क्षेत्रत गेल्या आठवडय़ात तीन दिवस आणि सोमवारीही या प्रभागासाठी नेमून देण्यात आलेल्या कचरावेचक गाडय़ांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच आहे. परिणामी, महापालिकेच्याच उपइमारतीलगत असलेल्या फतेह अली रोड, नालंदा आदी ठिकाणी कुंडय़ांमध्ये कच:याने अवस्था बकाल झाली आहे. 
त्यावर येथील रहिवाशांसह प्रसिद्धिमाध्यमांनी आयुक्तांसह प्रभाग अधिका:यांना याबाबतची सूचना दिल्यावर शनिवारी या ठिकाणचा कचरा स. 11 नंतर उचलण्यात आला. मात्र, रविवारी रात्रीपासून मात्र सोमवारी सकाळ-दुपार्पयत पुन्हा स्थिती जैसे थे झाली. याबाबत, या प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक नरेंद्र धोत्रे यांनी सांगितले की, आता तीन गाडय़ांमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून या सर्व गाडय़ांचे प्लेसर-डम्पर बिघडलेले आहेत. 
पर्यायी व्यवस्था केलेली गाडीही कल्याणमध्ये बंद पडल्याने बुधवारी काही ठिकाणचा कचरा उचलता आला नाही. त्यासाठीची आवश्यक असणारी मात्र ती पर्यायी व्यवस्था न झाल्याने परिणामी ठिकठिकाणी कच:याचे ढीग साठले. त्यामुळेच रेमण्ड, नालंदा आणि अन्य ठिकाणच्या कचराकुंडय़ांमध्ये कचरा साठल्याने बुधवारसह गुरुवारीही दरुगधी सुटली. त्याचा त्रस या ठिकाणच्या रहिवाशांना होत असून सोमवारपासून शाळाही सुरू झाल्या आहेत. त्यातच परिसरात हॉस्पिटल, बँका, रिक्षा स्टॅण्ड आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी सातत्याने वर्दळ असून त्या सर्व नागरिकांना याचा प्रचंड त्रस होत आहे. (प्रतिनिधी)
 
4रविवारी यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी दखल घेऊन कच:याची समस्या वास्तव असून पक्षातर्फे कचरा संबंधित अधिका:यांच्या टेबलवर टाकण्याचे धाडस आम्हीच केल्याचे सांगितले होते. सत्ताधा:यांना ते जमत नसेल तर त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी वल्गना करू नयेत.
4अधिका:यांनीही स्वच्छता जमत नसेल अन् इच्छाशक्ती नसेल तर तसे स्पष्ट करावे. पुन्हा आंदोलन छेडण्यास वेळ लागणार नाही, असा सूचक इशाराही दिला आहे. दरम्यान, याच पक्षाच्या नगरसेवकांच्या वॉर्डातच ही समस्या जटील झाली आहे. त्यामुळे संबंधितांना वृत्त-फोटो येताच कानपिचक्या देण्यात आल्याचेही सूत्रंनी सांगितले.