Join us

चर्नी रोड स्थानकावर हवा पादचारी पूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:43 IST

चर्नी रोड रेल्वे स्थानकाची दुरवस्था ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी विभागीयरेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्यासह बुधवारी स्थानकाची पाहणी केली.

मुंबई : चर्नी रोड रेल्वे स्थानकाची दुरवस्था ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी विभागीयरेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्यासह बुधवारी स्थानकाची पाहणी केली. शिवाय फलाट क्रमांक २ वर प्रवाशांसाठी पादचारी पूल उभारण्याची मागणी केली.अरविंद सावंत यांनी सांगितले की, गिरगावमधील प्रवाशांच्या समस्या व्यवस्थापकांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. फलाट क्रमांक २ वरील प्रवाशांना गिरगावला जाण्यासाठी असणाºया पुलापर्यंत पोहोचण्यासाठी चर्चगेटच्या दिशेने संपूर्ण फलाट चालत जावे लागते, शिवाय पुन्हा पूल चढून सैफी रुग्णालयाकडे यावे लागते. ही रचना प्रचंड गैरसोयीची असून, गिरगावला जाण्यासाठी प्रवाशांसाठी स्थानकावर नवा पूल बांधण्याची गरज आहे. शिवाय या पुलाला सरकते जिने बसविण्याची मागणीही रेल्वे अधिकाºयांकडे केली आहे.पाहणी दौºयातील संबंधित अधिकाºयांनी मागण्या रास्त असल्याचे सांगितले. त्यानंतर, सावंत यांनी स्थानिक नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्यासह चर्नी रोड रेल्वे स्थानकातून लोकलने महालक्ष्मी रेल्वे स्थानकापर्यंत प्रवासही केला. शिवाय महालक्ष्मी स्थानकाची पाहणी करत, रेल्वे अधिकाºयांसमोर येथील समस्यांचा पाढा वाचला. एकंदरीतच या पाहणी दौºयामुळे किमान प्रवाशांसाठी आवश्यक पादचारी पूल उभारण्याच्या मागणीचा श्रीगणेशा झाल्याची प्रतिक्रिया गिरगावकरांमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :आता बासमुंबई लोकल