मुंबई : एअर इंडियाच्या विमानात तब्बल एक कोटी बारा लाख रूपयांचे सोने सापडले़ प्रवाशाच्या आसनाखाली हे सोने लपवून ठेवले होते़ याप्रकरणी रहेमतउल्ला मोहम्मद अली फरीद या आरोपीला अटक करण्यात आले आहे़ विमानामार्गे बेकायदापणे सोने आणण्याची ही गेल्या पंधरा दिवसांतील तिसरी घटना आहे़
मुळचा भटकळ येथील असलेला फरीद हा एअर इंडियाच्या विमानाने दुबईहून मुंबईला येत होता़ तो बेकायदा सोने आणत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली़ त्यानुसार त्याच्या आसनाची तपासणी करण्यात आली़ त्यात ३७ सोन्याची बिस्कीटे सापडली़ त्यानंतर त्याचीही झडती घेण्यात आली़ त्यात त्याच्याकडे सोने सापडले़ हे सोने तब्बल साडेचार किलोचे आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}