ठाणे : एअर इंडियाचे विमान येत्या शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी ‘हायजॅक’ करण्याची धमकी देणारा फोन ठाण्यातील एअर इंडियाच्या कॉल सेंटरमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे. आपण इसिस या अतिरेकी संघटनेचा सदस्य असल्याची बतावणी फोन करणाऱ्या व्यक्तीने केली. हा फोन मध्य प्रदेशातून करण्यात आल्याची माहिती उघड झाल्याचे ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. ‘मैं इसिस का आतंकवादी बात कर रहा हूँ, हम २८ नव्हंबर को एअर इंडिया का प्लेन हायजॅक करनेवाले है.’ अशी धमकी या अनोळखी व्यक्तीने २० नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या ठाण्यातील कॉल सेंटरला फोन करून दिली. या प्रकरणी संबंधित कॉल सेंटर व्यवस्थापनाने श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, ठाणे पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकानेही या प्रकरणी तपास सुरू केला आहे.(प्रतिनिधी)
विमान ‘हायजॅक’चा तो फोन मध्य प्रदेशातून
By admin | Updated: November 24, 2015 02:43 IST