Join us

'एआयबी'शो : दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करा - कोर्ट

By admin | Updated: February 12, 2015 16:12 IST

वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी कडक कारवाईचे आदेश दिले.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. १२ - अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रीय व वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी कडक कारवाईचे आदेश दिले. अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यासह अन्य १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आभा सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या कार्यक्रमात अतिशय अश्लिल आणि कमरेखालचे विनोद असून महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत घरात हा कार्यक्रम पाहिलाच जाऊ शकत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'एआयबी नॉकआऊट' कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत हा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, अभिनेता आमीर खानने या कार्यक्रमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.