Join us  

मुंबईसह महाराष्ट्रातल्या कृषी आणि मत्स्यव्यवसाय स्टार्टअप्सने हैद्राबाद मध्ये उमटवला आपला ठसा 

By मनोहर कुंभेजकर | Published: January 25, 2024 4:38 PM

महाराष्ट्रातील दहा स्टार्टप्सने घेतला सहभाग. 

मनोहर कुंभेजकर, मुंबई : भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या एबीग्रो २.० या कार्यक्रमांमध्ये भारतातील विविध ऍग्री बिझनेस इंक्युबॅशन मधील स्टार्टअप बिझनेस समाविष्ट झाले होते.भारतातील वेगवेगळ्या राज्यातून कृषी आणि मत्स्य व्यवसाय या विषयातील अनेक स्टार्टअपनीं भाग घेतला होता. एकूण ३३ स्टार्टअप मधून महाराष्ट्रातील दहा स्टार्टप्सने तर मुंबईतील ४ स्टार्टअप्स सहभागी झाले होते.

 भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सीआयएफएफ( सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन-मुंबई),सीआयआयआरसीओटी(  भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सीआयएफएफ( सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च कॉटन टेक्नॉलॉजी-मुंबई),सेंट्रल कोस्टल अँग्रीकल्चर इन्स्टिट्यूट-गोवा, शिवाजी युनिव्हर्सिटी,एनआरसीजी ( नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स -पुणे) यातील इन्क्युबेशन सहभागी झाले होते.

उद्योजकांचे भरभक्कम जाळे पसरावे आणि समृद्ध महाराष्ट्राच्या कृषी आणि मत्स्यव्यसायाला सुगीचे दिवस यावे असे फिशरमेन चेम्बर ऑफ कामर्सचे संस्थापक विकास कोळी यांनी  सांगितले.ते स्वतः या उपक्रमात मच्छिमारांचे एक अनोखे स्टार्टअप घेवून सहभागी झाले होते.

मुंबईतून विकास कोळी,माधवी कोकाटे, सानिका पाटील, अक्षय जाधव, तिश्या संबोधी,सिद्धी आणि रिद्धी राणे तसेच इंदोरचे सुमित पाटीदार यांनी भाग घेतला होता. नाशिकचे डॉ प्रदीप कागणे, पुण्यातील सचिन देशपांडे, सांगलीचे डॉ प्रतापसिंह चव्हाण, योगेश अडसूळ तसेच कोल्हापूरहून डॉ सुप्रिया कुसाळे, प्रतीक कुसाळे यांनी सहभाग घेतला होता.

हा उपक्रम ३ दिवसीय ट्रेनिंग आणि स्टार्टअप्सला मजबुती देण्यासाठी नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च अँड मॅनेजमेंट, हैदराबाद ( एनएएआरएम)  येथे २२ जानेवारी ते २४ जानेवारी  रोजी आयोजित करण्यात आला होता.

टॅग्स :हैदराबाद