Join us  

आरे कॉलनीतील वृक्षतोडविरोधी आंदोलन सुरूच; नाकाबंदी, जमावबंदीही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 5:06 AM

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरूच असून, या परिसरात नाकाबंदी आणि जमावबंदी कायम आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले. पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दुपारी आंबेडकर यांना सोडून देण्यात आले. शुक्रवारसह शनिवारी अटक केलेल्या २९ आंदोलकांची सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यात येऊ नये, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्यानंतर रात्रीच प्रशासनाने वृक्षतोडीचे काम हाती घेतले. शनिवारी दिवसभर वृक्षतोड सुरू असतानाच, पोलिसांनी आरे कॉलनी परिसरात नाकाबंदीसह जमावबंदीचे आदेश दिले. शंभर आंदोलकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर २९ आंदोलकांना अटक केली होती. स्थानिकांनी अटक केलेल्या २९ आंदोलकांची सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यात येऊ नये, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्यानंतर रात्रीच प्रशासनाने वृक्षतोडीचे काम हाती घेतले. शनिवारी दिवसभर वृक्षतोड सुरू असतानाच, पोलिसांनी आरे कॉलनी परिसरात नाकाबंदीसह जमावबंदीचे आदेश दिले. शंभर आंदोलकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर २९ आंदोलकांना अटक केली होती.

स्थानिकांनी रविवारी गोरेगाव पूर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मानवी साखळी करून सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. पाच मिनिटाला एक झाड असा वृक्षतोडणीचा वेग होता. शनिवारी रात्रीपर्यंत २,१८५ झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. एमएमआरडीएकडून मेट्रोचे १४ प्रकल्प राबविले जाणार आहेत.अश्विनी भिडे यांचे पुन्हा ट्विट‘जीवनचक्र प्रवाही असते. ते एका ठिकाणी थांबत नाही. सृजनाची चाहूल पुन्हा-पुन्हा लागत राहते. नवीन पालवी फुटत राहते. नवनिर्मिती होत राहते,’ असे ट्विट एमएमआरसीच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी केले आहे, तर एमएमआरसीने एक नवीन व्हिडीओ ट्विट केले. एमएमआरसीने मुंबई व आरे परिसरात २४ हजार वृक्षांची लागवड केल्याची माहिती त्यात दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीविधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षतोडीबाबत पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले आहे. सोमवारी सुनावणी होईल. यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले आहे.

टॅग्स :आरे