Join us  

Corona Virus: मुंबईत पुन्हा ‘झिरो कोरोना’ मिशन; वाढत्या रुग्णांमुळे महापालिकेचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 6:27 AM

मुंबई महापालिकेचा सर्वत्र वॉच : नियम पाळण्याचे सर्वसामान्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकर, आपण कोरोनाला हरविण्याच्या मार्गावर आहोत. आता मागे वळून बघायचे नाही. पुढेही मिशन झिरो पूर्ण करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करूया, असे आवाहन मुंबई महापालिकेने यापूर्वी केले होते. मात्र गेल्या पंधरा एक दिवसांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेचे देखील धाबे दणाणले आहेत. परिणामी मुंबईकर, आम्ही आपल्यावर नजर ठेवून आहोत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवून मिशन झिरो साध्य करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कृपया मास्कचा वापर करा, असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा केले आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर २०० रुपये एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे. त्यानुसार रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, जून-जुलै २०२० मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्‍ण वाढत असल्‍याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड १९ प्रतिबंधात्‍मक निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

असे आहे महापालिकेचे मिशनnज्या व्यक्तिंना कोविड संबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी किंवा खासगी वैद्यकीय प्रयोग शाळांकडून आवर्जून करावी. nसर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना यापूर्वीच दिलेल्या सुचनांनुसार कोविड बाधितांच्या चाचणीचे अहवाल हे प्रथम पालिकेला कळविणे बंधनकारक आहे.nखाटांची संभाव्य गरज लक्षात घेऊन २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे.nरुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणे बंधनकारक आहे.nगृह विलगीकरणात असलेले, लक्षणे नसलेले रुग्ण हे घरातच असल्याची खातरजमा करण्यासाठी वॉर्ड वॉर रुमद्वारे दररोज ४ वेळा दूरध्वनी करावेत.nरुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाची कार्यवाही वॉर्ड वॉर रुमद्वारेच करणे आवश्यक आहे.nज्या इमारतींत ५ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येतील, अशा इमारती सील कराव्यात.nरेल्‍वे प्रवासात मास्‍क न घालणाऱ्यांवर कारवाईसाठी ३०० मार्शल.nविना मास्‍क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट, दररोज २५ हजार जणांवर कारवाईnखेळाच्‍या मैदानांवर व उद्यानांमध्‍ये देखील मास्‍क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस