Join us

तर पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार

By admin | Updated: September 19, 2014 02:52 IST

आघाडी सरकार सत्तेत पुन्हा आले आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही़

मुंबई : आघाडी सरकार सत्तेत पुन्हा आले आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही़ पक्षातील दुस:या कोणाला उपमुख्यमंत्री व्हायला सांगेन, अशी थेट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी घेतली़आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होत़े पवार म्हणाले, 2क्क्4 मध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या़ तरीही आम्ही मुख्यमंत्रीपद घेतले नव्हत़े यावेळी राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या तर आम्ही मुख्यमंत्रीपद घेऊ़ 2क्क्4मध्ये केलेली चूक पुन्हा करणार नाही, असे ते म्हणाल़े
मुख्यमंत्री चव्हाण कराडमधून विजयी होतील का, या प्रश्नावर ते म्हणाले की, ते मुख्यमंत्री आहेत ते जिंकतीलच़ या आधी कोणी मुख्यमंत्री पराभूत झालेले नाहीत़ कराडमधून लढण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी साडेतीन वर्षापूर्वी करायला हवी होती़ कराडसाठी त्यांनी निधी खूप नेला, पण अजूनही तेथे रस्ते खराबच आहेत. बारामतीचे रस्ते खूप चांगले आहेत, ते येऊन बघा, असा टोलाही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला़ 
राज्यातील कथित सिंचन घोटाळ्याची चौकशी चितळे समितीमार्फत करण्यात आली होती़ त्यामुळे यावर वेगळी श्वेतपत्रिका काढण्याची गरज नव्हती़ सार्वजनिक बांधकाम खात्याला आयएएस दर्जाचा सचिव असावा, अशी भूमिका आपणदेखील मांडलेली होती़  मुख्यमंत्र्यांनी त्याचा निर्णय घ्यायला हवा होता़ 
एवढेच नव्हे तर, सामाजिक न्याय विभागाचे बजेट सहा हजार कोटी रुपयांचे असत़े तेथे आयएएस दर्जाचे दोन सचिव असावेत, असा आग्रहही मी धरला होता़ पण तेही झाले नाही, या शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केली़
राज्य सहकारी बँक कोटय़वधी रुपयांच्या नफ्यात असल्याचे चित्र आज दिसते आणि त्याचे श्रेय प्रशासकांना दिले जात आह़े ते योग्य नाही़ मी अर्थमंत्री म्हणून साडेतीनशे कोटी रुपये बँकेला वेळीच दिल्यामुळे बँकेला परवाना मिळणो सोपे झाल़े आणि बँक सुरळीत सुरू झाली, असे पवार म्हणाल़े (विशेष प्रतिनिधी)