Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दोन वर्षांनी मारेकरी अटकेत

By admin | Updated: January 24, 2017 06:09 IST

दोन वर्षांपुर्वी एका इसमाची हत्या करून फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या रविवारी रात्री आवळण्यात आल्या. ही कारवाई गुन्हे शाखा

मुंबई : दोन वर्षांपुर्वी एका इसमाची हत्या करून फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या रविवारी रात्री आवळण्यात आल्या. ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष आठने केली असुन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सांताक्रुझ पश्चिमेकडील एका खंडरमधुन गुन्हे शाखेने तरबेज ऊर्फ सदरेश ऊर्फ टीनु शेख (२८) आणि डेरियल ऊर्फ जोसेफ ऊर्फ डेविड मोरोडोस (२९) या दोघांना रविवारी ताब्यात घेतले. त्यांना नंतर निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.आमच्या विभागाचे पोलीस निरीक्षक जोशी आणि त्यांचे पथक गेल्या सहा महिन्यांपासुन या दोघांच्या मागावर होते, असे युनिट आठचे प्रमुख व्हावळ यांनी सांगितले. निर्मलनगर परिसरात असलेल्या संजीवनी सोसायटीत राहणाऱ्या दोन गटांमधे वाद होते. ज्यात नासीर नावाच्या एका इसमाची हत्या दोन वर्षांपुर्वी करण्यात आली होती. याचा राग काढण्यासाठी नासिरच्या गटातील लोकांनी विरोधी गटातील विशाल कांबळे नामक तरुणाची हत्या केली. २१ डिसेंबर २०१५ रोजी घडलेल्या या प्रकारानंतर तिघांना पोलिसांनी तेव्हाच अटक केली. मात्र शेख आणि मोरोडोस हे फरार होते. पोलिसांचा पाठलाग चुकविण्यासाठी दीड वर्षे हे दोघे त्यांच्या घरी देखील नव्हते. मात्र अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांना पुढील तपासासाठी निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)