Join us  

अडीच महिन्यांनंतरही पालिकेचे विद्यार्थी शालेय वस्तूंच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 1:05 AM

योजनेच्या उद्धिष्टालाच पुन्हा एकदा हरताळ

मुंबई : महापालिका शाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले आहेत. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शालेय वस्तू पोहचलेल्या नाहीत. तर काही ठिकाणी निम्म्या वस्तुूचे वाटप झाले आहे. यावषीर्ही महापालिका प्रशासनाला या वस्तू वाटपाची डेडलाईन पाळता आलेली नाही. आता या वस्तू वाटपासाठी १५ ऑगस्टची मुदत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या उद्धिष्टालाच पुन्हा एकदा हरताळ फासले गेले आहे.२००७ पासून पालिका प्रशासनाने ही योजना आणली. या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू देण्यात येतात. यामध्ये दप्तरपासून बुटांपर्यंत सर्व वस्तुंचा समावेश आहे. पालिका शाळा १५ जूनपर्यंत सुरु होत असतात. त्यापूर्वी या वस्तू विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असते. मात्र दरवर्षी वस्तू पोहचण्यास विलंब होत असल्याने या योजनेला लेटमार्कच लागत आहे. तसेच या वस्तूंच्या दर्जेबाबतही सवाल उपस्थित केला जात आहे. हे वर्षही त्यास अपवाद नाही, असे दिसून येत आहे. या वस्तूंऐवजी आगामी शैक्षणिक वषार्पासून थेट रक्कम देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला होता. अखेर वस्तूंचे वाटप जून महिन्यात सुरु करण्यात आले. काही ठिकाणी अपुरा पुरवठा तर काही ठिकाणी वस्तूच पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. १० ऑगस्टपर्यंत सर्व पालिका शाळांमध्ये वस्तू पोहचतील असे आश्वासन शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दिले होते. मात्र पुढच्या आठवड्यात सार्वजनिक सुट्ट्या अधिक असल्याने वस्तूंचे वाटप १५ तारखेनंतरच होऊ शकेल, असे शिक्षण खात्यातील सुत्रांकडून समजते.२००७ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली. पालिका शाळांमध्ये येणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण करण्यासाठी अशा काही योजना सुरु करण्यात आल्या होत्या.पालिकेच्या ११०० शाळांमध्ये सुमारे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू दिली जातात. यामध्ये गणवेश, बूट, मोजे, दप्तर, पाण्याची बाटली अशा वस्तूंचा समावेश आहे.ठेकेदारांनी दिलेल्या वस्तूंचा दजार्ही सुमार असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेकवेळा नगरसेवकांनी तक्रार केली आहे. मात्र पालिका शाळांमध्ये मिळणाऱ्या वस्तूंच्या दर्जेवर आजही सवाल उठवला जात आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाविद्यार्थी