Join us

अलिबागमध्ये तीन अर्ज बाद

By admin | Updated: September 29, 2014 22:45 IST

अलिबाग विधानसभा मतदार संघातील तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी अवैध ठरविले.

अलिबाग : अलिबाग विधानसभा मतदार संघातील तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी प्रांताधिकारी  तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी अवैध ठरविले. त्यामध्ये समाजवादी पार्टीचे अशरफ घट्टे यांचा समावेश असल्याने त्यांना सर्वाधिक धक्का बसला आहे. 
अलिबाग विधानसभा मतदार संघासाठी 27 सप्टेंबर्पयत 24 उमेदवारांनी 31 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे आज अखेर 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असले तरी, 1 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. छाननीच्या वेळी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार उपस्थित होते. समाजवादी पार्टीचे अशरफ घट्टे यांनी नियमाप्रमाणो आपल्या अर्जामध्ये 1क् सूचक  दिले नव्हते. तसेच काँग्रेसचे अॅड.प्रवीण ठाकूर यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्याचप्रमाणो अपक्ष उमेदवार राजेश विठोबा तांडेल यांचे प्रतिज्ञापत्र परिपूर्ण नसल्याचे कारण देत प्रांताधिकारी क्षीरसागर यांनी तो अर्ज अवैध ठरविला. 1 ऑक्टोबर रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, शिवसेनेचे महेंद्र दळवी, शेकापचे सुभाष तथा पंडित पाटील, आस्वाद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड.महेश मोहिते, भाजपाचे प्रकाश काठे , बसपाचे अनिल गायकवाड, जनता दल युनायटेडचे महेंद्र दळवी, बहुजन विकास आघाडीचे श्रीनिवास मट्टपरती या नऊ प्रमुख राजकीय पक्षांसह 12 अपक्ष असे एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 
अनिल तटकरे व एक अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध
च्बोर्ली-पंचतन : 193 o्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून 23 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी 21 अर्ज वैध ठरून विधानपरिषदेचे आमदार अनिल तटकरे (अपक्ष) व फरीद फारूक उभारे (अपक्ष) यांचे अर्ज आज झालेल्या छाननीमध्ये अवैध ठरले. त्यामुळे आता 6 पक्ष, 16 उमेदवारांचे 21 अर्ज वैध ठरले आहेत. 
च्o्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाकडे सा:या राज्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आज नामनिर्देशन छाननी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, o्रीवर्धन येथे घेण्यात आली. यासाठी उमेदवारांसह राजकीय नेते मंडळी, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. झालेल्या छाननीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विधानपरिषदेचे विद्यमान आमदार अनिल तटकरे तसेच दुसरे अपक्ष उमेदवार फरीद फारूक उभारे यांचे अर्ज अवैध ठरले.
च्तर शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होवून अपक्ष व भारतीय जनता पार्टीकडून नामनिर्देशन पत्र सादर करणारे कृष्णा कोबनाक यांच्या अर्जावर शिवसेनेचे उमेदवार रवींद्र मुंडे यांनी आक्षेप घेतला होता.परंतु निवडणूक निर्णय अधिका:यांनी तो फेटाळत कृष्णा कोबनाक यांचा अर्ज वैध ठरविला. 
च्अनिल तटकरे यांनी अर्ज सादर करताना निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष शपथ घेतली नाही व उभारे यांनी छाननीपूर्वी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. म्हणून अनिल तटकरे व फरीद उभारे यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. सायंकाळी 6.4क् नंतर देखील छाननी प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 23 अर्जापैकी सध्या 21 अर्ज वैध ठरले आहेत.
 
पनवेलमध्ये 19 उमेदवारी अर्ज वैध
च्पनवेल : विधानसभा मतदारसंघात झालेल्या छाननीत सोमवारी एकूण 13 अर्ज बाद झाले, तर 19 उमेदवारी अर्ज राहिले. 27 सप्टेंबर्पयत 26 उमेदवारांनी 32 अर्ज दाखल केले होते. आज निवडणूक निर्णय अधिका:यांच्या दालनात या अर्जाची छाननी झाली. यावेळी कागदपत्रंची तपासणी करण्यात आली. त्यात काहींचे अर्ज फेटाळण्यात आले. 
च्एकूण 19 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आल्याचे सुदाम परदेशी यांनी सांगितले. यात प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील, आर. सी. घरत, सुनील घरत, वासुदेव घरत, केसरीनाथ पाटील यांच्यासह इतर उमेदवारांचा समावेश आहे. 
 
महाडमध्ये आठ उमेदवार रिंगणात
1महाड : 194 महाड विधानसभा मतदार संघात एकूण आठ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांच्या डमी उमेदवारांनी एकाचा एबी फॉर्म सादर केल्यामुळे डमी उमेदवार आपोआपच रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
2या मतदारसंघातून माणिक जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), भरत गोगावले (शिवसेना), प्रणय सावंत (बसपा), लक्ष्मण निंबाळकर (अपक्ष), सुरेंद्र चव्हाण (मनसे), उदय आंबोणकर (राष्ट्रवादी), सुधीर महाडिक (भाजपा), मंगेश हुमणो (बहुजन समाज पक्ष), असे आठ उमेदवार रिंगणात आहेत.