Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांनंतर गीता टॉकीज सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 02:25 IST

वरळी येथील गीता टॉकीज पुन्हा एकदा चित्रपटा रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मुंबई : वरळी येथील गीता टॉकीज पुन्हा एकदा चित्रपटा रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. २५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ या चित्रपटाचा माध्यमातून हे चित्रपटगृह मनोरंजन करण्यास उपलब्ध होणार आहे. थिएटर सुरू करण्यासाठी लोढा प्रशासनाने आवश्यक परवानग्या आणि दुरुस्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेनेचे वरळी उपविभागा प्रमुख अभिजीत पाटील यांनी सांगितले. लोढा प्रशासन मात्र मौन बाळगून आहे़