Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६ तासांनतर डोंबिवलीतील आग आटोक्यात

By admin | Updated: March 5, 2016 19:15 IST

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं

ऑनलाइन लोकमत 
डोंबिवली, दि. ५ - डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं. आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही मात्र लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 
 
मानपाडा रोडवरील शनि मंदिराजवळ असलेल्या अल्ट्रा प्युअर आणि जागृती केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी ही आग लागली होती. आग मोठ्या प्रमाणात असल्याने आग नियंत्रणात येत नव्हती. मात्र  अग्निशमन दलाच्या १० गाड्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. सकाळी लागलेल्या या आगीमुळे कंपनीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचे गोदाम खाली करण्यात आले होते. १५६ हून जास्त सिलेंडर बाहेर काढण्यात आले होते. ही आग एवढी भीषण होती की ब-याच अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा व धूराचे लोट दिसत होते.