Join us  

टंचाईची तहान लागल्यानंतर पालिकेची विहिरींकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 7:00 AM

प्रमुख तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस खालावत असल्याने लवकरच राखीव साठ्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मान्सूनला आणखी महिनाभराची प्रतीक्षा असल्याने पाण्यासाठी पर्यायी स्रोतांसाठी पालिकेची धावाधाव सुरू आहे.

मुंबई : प्रमुख तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस खालावत असल्याने लवकरच राखीव साठ्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मान्सूनला आणखी महिनाभराची प्रतीक्षा असल्याने पाण्यासाठी पर्यायी स्रोतांसाठी पालिकेची धावाधाव सुरू आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार आता मुंबईतील विहिरींची सफाई करून त्या पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत.गेल्या दशकात मुंबईत आठ हजार ७३४ विहिरी होत्या. झपाट्याने सुरू असलेले इमारतींचे बांधकाम, व विकासामुळे अनेक विहिरी बुजविल्या आहेत. विहिरींमधील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मात्र देखभाल व अस्वच्छतेमुळे अनेक विहिरींचे पाणी वापरण्यास योग्य राहिलेले नाही. त्यामुळे आता मुंबईतील विहिरींची सफाई करून त्या पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.अर्थसंकल्पात दहा लाखांची तरतूदतलावांमध्ये आवश्यकतेपेक्षा १५ टक्के कमी जलसाठा असल्याने १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तलावांमध्ये असलेला जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेल असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र विहिरी स्वच्छ करून पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्थसंकल्पात १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नगरसेविका ज्योती खान यांच्या यासंदर्भातील ठरावाच्या सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबई