Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या इनिंगनंतर भात लावणीचा मोसम पुन्हा सुरू

By admin | Updated: July 14, 2014 01:40 IST

सुरुवातील पावसाने उचल घेतली असताना शेतकरी वर्गाने भातशेतीची कामे जोरात सुरु केली खरी मात्र पावसाच्या थंडाव्याने ही कामे ठप्प झाली.

पारोळ : सुरुवातील पावसाने उचल घेतली असताना शेतकरी वर्गाने भातशेतीची कामे जोरात सुरु केली खरी मात्र पावसाच्या थंडाव्याने ही कामे ठप्प झाली. काही ठिकाणी लावलेली रोपे करपली तर कुठे भात रुजूनच आले नाही. पावसाला दोन दिवसापासून सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरीवर्गाने लावणीच्या कामांना सुरुवात केली.वसई पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भात शेती होत असल्यामुळे व पाऊस लांबल्यामुळे भात लावणी कशी करावी? या चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच लावणीला सुरूवात केल्याचे चित्र सध्या सगळीकडेच दिसून येत आहे. भात लावणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट असून सर्वसामान्य नागरिकांसाठीही तेवढाच हा महत्त्वाचा हंगाम म्हणायला हवा. लावणी जर वेळेवर झाली तर पीक वेळेवर येऊन त्या पिकाला रोगाचा वा कमी पावसाचा सामना करावा लागत नाही आणि बाजारात पीकच आले नाही तर नागरिकांना भात मिळणार तरी कसे? लावणीसाठी शेतकऱ्याला मजूर, ट्रॅक्टर वा नांगर, खतासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागते.