Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोघांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याने गमावले पाय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:48 IST

वडाळ्यातील भक्ती पार्क येथे झालेल्या अपघातात दोन तरुणांनी प्राण गमावले. तर यामध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुणाला या अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले.

मुंबई : वडाळ्यातील भक्ती पार्क येथे झालेल्या अपघातात दोन तरुणांनी प्राण गमावले. तर यामध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुणाला या अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले. हे तिघेही मराठा मोर्चावरून घरी परतत असताना हा अपघात झाल्याचे समजते.वडाळ्यातील भक्ती पार्क येथील मोनो रेल बस स्टॉपजवळ बाइक पार्क करून मराठा मोर्चाला गेलेले तिघे जण रस्त्याच्या दुभाजकावर बसले होते. तेव्हा तेथे आलेल्या एका ट्रकची या तिघांना जोरदार धडक बसली.या अपघाता विनायक भास्कर ढगे (२३), सिद्धेश मासे (२२) यांचा मृत्यू झाला. तर सुरेश चव्हाण (२२) गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातात त्याने दोन्ही पाय गमावल्याची माहिती समोर येत आहे. सुरेशची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी ट्रक चालक सलीम शेखला (४५) अटक केली असून अपघातावेळी नेमके काय घडले याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.