ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - साकीनाका परिसरात बसची धडक बसून झालेल्या अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत बस चालकालाही डांबून ठेवले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्तात वाढ केली.
काल रात्री ११.३०च्या सुमारास ही घटना घडली. रमजाननिमित्त साकीनाका परिसर गर्दीने गजबजून गेला आहे. याच भागातून जाणा-या बसची काही पादचा-यांना धडक बसली, ज्यात एका पादचा-याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतापले व त्यांनी बसवर दगडफेक करत तोडफोड केली तसेच बसचालकालाही डांबून ठेवले. अखेर पोलिस आल्यानंतर त्याची नागरिकांच्या तावडूतन सुटका झाली.
दरम्यान पोलिसांनी बसचालकाला अटक केली असून त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.