Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीच्या टि्वटनंतर जास्त मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:29 IST

अभिनेत्री रीना अगरवालच्या टिवटनंतर चेंबूर परिसरात जास्त प्रमाणात रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची वाहतूक करणा-या टेम्पोवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

मुंबई : अभिनेत्री रीना अगरवालच्या टि्वटनंतर चेंबूर परिसरात जास्त प्रमाणात रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची वाहतूक करणा-या टेम्पोवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.चेंबूर येथील पेस्टम सागर कॉलनी येथे जास्त प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पोचा फोटो ट्विट करून हे कायदेशीर आहे का असा सवाल अभिनेत्री रीना अगरवाल हिने मुंबई पोलिसांना विचारला. त्या ट्विटची दखल घेत चेंबूर वाहतूक विभागाने तत्काळ कारवाई केली. याप्रकरणी वाहनचालकाला २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाई बद्दल रीना अगरवाने पोलिसांचे आभार मानले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना यामुळे धडा मिळेल असे तिने म्हटले आहे.