Join us
Daily Top 2Weekly Top 5

६५ दिवसांनी ११ अंड्यांतून १० सर्पांचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:55 IST

नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सुनीश सुब्रमण्यम, वन्यजीव पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे, रेंज फॉरेस्ट आॅफिसर संतोष कंक आणि निशा कुंजू यांची याकरिता मदत झाली.

मुंबई : दहिसर पूर्व येथील घरटण पाडा क्रमांक २, वैशालीनगर येथून प्लांट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी, अम्मा केअर फाऊंडेशनचे स्वयंसेवक किरण रोकडे आणि विजय वर्थे यांनी आसपास तस्कर प्रजातीच्या सर्पांची सुटका केली होती. सर्पांची सुटका केल्यानंतर मात्र घटनास्थळी सर्पाची ११ अंडी आढळून आल्याने स्थानिकांनी सर्पमित्रांच्या लक्षात आणून दिली. यावर सर्पमित्रांनी वनखात्याच्या मदतीने ६५ दिवसांपासून ११ अंड्यांची काळजी घेतली. आणि नैसर्गिक सहसावात ११ अंड्यांची काळजी घेतल्यानंतर ६५ दिवसांपासून ११ अंड्यांतून १० सर्पांच्या पिल्लांचा जन्म झाला. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सुनीश सुब्रमण्यम, वन्यजीव पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे, रेंज फॉरेस्ट आॅफिसर संतोष कंक आणि निशा कुंजू यांची याकरिता मदत झाली.