Join us  

सोशल मीडियामुळे ३० वर्षांनंतर झाली ‘बॅचमेट्स’ची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 2:40 AM

आयुष्यात प्रत्येकाला आपले शालेय जीवन खूप प्रिय असते. शाळेतील मित्रांबरोबर केलेली धमाल-मस्ती न विसरण्यासारखीच. मात्र, संसाराचा गाडा हाकताना त्या आठवणींवर धूळ जमा होते आणि सर्व जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होऊन जातात. जुन्या मित्रांशी असलेला संपर्क तुटतो

मुंबई : आयुष्यात प्रत्येकाला आपले शालेय जीवन खूप प्रिय असते. शाळेतील मित्रांबरोबर केलेली धमाल-मस्ती न विसरण्यासारखीच. मात्र, संसाराचा गाडा हाकताना त्या आठवणींवर धूळ जमा होते आणि सर्व जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होऊन जातात. जुन्या मित्रांशी असलेला संपर्क तुटतो. अशाच काही वर्गमित्रांना एकत्र आणले ते सोशल मीडियाने.ताडदेव येथील युसुफ मेहेरअली विद्यालयातून ३० वर्षांपूर्वी (१९८८ साली) एसएससीची परीक्षा दिल्यानंतर ‘त्या’ बॅचमधले मित्र-मैत्रिणी कायमचेच दुरावले. इतक्या दिवसांत एकमेकांशी ना संपर्क ना भेटीगाठी. पण दुरावलेले हे मित्र एकत्र आले ते फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपमुळे. बॅचमधल्या ओम्कार, मोहन, दीपक आणि मीना यांनी फेसबुकद्वारे जुन्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. व्हॉटसअ‍ॅपचा गु्रप बनवून सर्वांना त्यात सामील केले. रविवार, ११ फेब्रुवारी रोजी सर्वांनी जुन्या शाळेत भेटण्याचे ठरविले.१९८८ साली एसएससी दिल्यानंतर एवढ्या वर्षांनी ते पुन्हा एकत्र येणार होते. ठरल्याप्रमाणे सकाळी सर्व जण शाळेच्या एका वर्गात जमा झाले. प्रत्येकाच्या चेहºयावर आनंद झळकत होता. सर्वांनी अगदी उत्सुकतेने एकमेकांची विचारपूस केली.प्रथम राष्ट्रगीत आणि त्यानंतर दिवंगत मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहण्याचा कार्र्यक्रम झाला.त्यानंतर स्वपरिचय झाला. वय विसरून तशाच गप्पा, तसेच चिडवणे चालू होते. थोड्या वेळासाठी वर्तमान विसरून ते सर्व जण भूतकाळातील शालेय जीवन जगत होते. मित्र-मैत्रिणी हे हिºयासारखे असतात, ते मिळवणे कठीण आणि त्यांना गमावणे त्याहून जास्त दु:खदायक असते, ही भावना प्रत्येकाच्या चेहºयावर झळकत होती. त्यामुळे ही मैत्री अजून घट्ट करण्यासाठी प्रत्येक जण मनापासून प्रयत्न करेल, अशी शपथ सर्वांनी घेतली.शाळेतून कोणाचाच पाय निघत नव्हता. जड अंत:करणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला; पण पुन्हा भेटण्याच्या अटीवरच.

टॅग्स :सोशल मीडिया