Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दहा दिवसांनंतर विक्रांत जाणार भंगारात

By admin | Updated: September 17, 2014 01:32 IST

विक्रांत युध्दनौका येत्या 1क् दिवसांनंतर भंगारात काढली जाणार आहे. रे रोड येथील दारुखान्यात ती भंगारात काढण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचे आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने सांगितले.

मुंबई :  विक्रांत युध्दनौका येत्या 1क् दिवसांनंतर भंगारात काढली जाणार आहे. रे रोड येथील दारुखान्यात ती भंगारात काढण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचे आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने सांगितले.
भारत-पाकिस्तान युध्दात गौरवशाली कामगिरी केल्यावर 1997 साली ही युध्दनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली. त्यानंतर या नौकेच कायमस्वरूपी संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार होते. देखभाल आणि दुरुस्तीच्या मागे येणारा कोटय़वधींचा खर्च पाहता ती भंगारात काढण्याचा निर्णय घेतला होता. आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने 63 कोटी रुपयांना ती विकतही घेतली. मात्र भंगारात निघणा:या विक्रांतला वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने विक्रातला भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला, परंतु विक्रांत बचाव समितीकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि न्यायालयाने त्यांचे म्हणणो ऐकून घेत त्यावर स्थगिती दिली. अखेर न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात विक्रांतची याचिका निकाली काढताना ती भंगारात काढण्यासाठी असलेली स्थगिती उठवली. याबाबत आयबी कंपनीचे संचालक अब्दुल करीम जाका यांनी सांगितले, की विक्रांत भंगारात काढण्याबाबतची सगळी प्रक्रिया सुरू असून येत्या 1क् दिवसांनतर ती भंगारात काढली जाईल. रे रोड येथील दारुखान्यात भंगारात काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.   (प्रतिनिधी)
 
1961
साली पहिले विमानवाहू जहाज असलेली युद्धनौका रुजू झाली. 
1965 
आणि 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी