Join us

मोनोच्या खांबांवर होणार जाहिरातबाजी; वेळेचे होणार नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 07:30 IST

mono : प्राधिकरणाने दोन मोनोरेलची पुनर्बांधणी केली आहे. भारतीय सुट्या भागाच्या मदतीने ही पुनर्बांधणी करण्यात आली आहे. स्वदेशी मोनोवर भर दिला जात आहे.

 मुंबई : वडाळा-चेंबूर-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल सातत्याने तोट्यात आहे. याचा परिणाम मोनोच्या महसुलावर होत आहे. महसूल वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जाहिरातबाजी करणार आहे. मोनोरेलच्या खांबांना जाहिरातबाजीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.प्राधिकरणाने दोन मोनोरेलची पुनर्बांधणी केली आहे. भारतीय सुट्या भागाच्या मदतीने ही पुनर्बांधणी करण्यात आली आहे. स्वदेशी मोनोवर भर दिला जात आहे. मोनो धावत असली, तरी तिला प्रतिसाद कमी आहे.  वडाळा, चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक  मार्गावर प्रवासी फार कमी आहेत.मुळात वडाळ्यासारख्या परिसरात रहिवासी वस्ती जास्त आहे. कार्यालये अथवा तत्सम वस्ती कमी आहे.  येथे रहदारीही कमी आहे. अशा वेळी थेट चेंबूरहून, वडाळ्याहून मध्य मुंबई म्हणजे लालबाग गाठणाऱ्या प्रवाशाची संख्या कमी आहे. ऐन पीक अवर म्हणजे सकाळी आणि सायंकाळीही मोनोरेलचे प्रवासी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे असतात.  मोनोरेल तोट्यात असली, तरी तिचे प्रवासी वाढावेत, म्हणून प्राधिकरण प्रयत्न करत आहे.प्राधिकरणाकडील माहितीनुसार, प्रवासी वाढविण्यासाठी दोन मोनोरेलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर कसे येईल? यावर भर दिला जात आहे.  मोनोरेलला महसूल मिळावा, म्हणून मोनोच्या खांबांवर जाहिरातीसाठी प्रयत्न केले जातील. आता प्राधिकरणाचे मोनोरेलच्या खांबांवर जाहिरातीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणणे असले, तरी त्यांना प्रतिसाद किती मिळतो, हे काळच ठरविणार आहे. मोनो जिथून जिथून धावते, तो परिसर फारसा रहदारीचा नाही. अशा वेळी संबंधित ठिकाणी जाहिरातदारांकडून किती प्रतिसाद मिळले, यावर प्रश्नचिन्ह आहे.  महालक्ष्मी ते दादरपर्यंतच्या मोनोरेलच्या प्रवासात मोठी वस्ती आहे. येथे मोनोरेलच्या खांबांवर जाहिराती लागल्या, तर निश्चितच काही तरी फरक पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

वेळेचे होणार नियोजनप्रवासी वाढविण्यासाठी दोन मोनोरेलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर कसे येईल, यावर भर दिला जात आहे.  मोनोरेलला महसूल मिळावा, म्हणून मोनोच्या खांबांवर जाहिरातीसाठी प्रयत्न केले जातील.  आता प्राधिकरण मोनोरेलच्या खांबांवर जाहिरातीसाठी प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :मोनो रेल्वे