Join us
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: January 18, 2015 23:22 IST

पालघर जिल्हा परिषदे व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या २८ जानेवारीमध्ये होणाऱ्या मतदानासाठी पालघर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.

पालघर : पालघर जिल्हा परिषदे व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या २८ जानेवारीमध्ये होणाऱ्या मतदानासाठी पालघर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकांसाठी लागणाऱ्या इव्हीएम मशीनसह इतर सामग्री जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाली आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ गटासह त्या अंतर्गत येणाऱ्या आठ तालुक्यातील पंचायत समितीच्या ११४ गणामध्ये येत्या २८ जानेवारी रोजी निवडणुका होत असून गट आणि त्या अनुशंगाने येणाऱ्या गणामध्ये इव्हीएम मशिन्स आणि इतर सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली असुन आता केवळ निवडणूकांच्या दिवसाची सर्वांनाच प्रतिक्षा लागुन राहिली आहे.