Join us

आदित्य ठाकरे यांच्या रोड शो ला जोगेश्वरीत मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 15, 2024 14:32 IST

विशेष म्हणजे महायुतीचे उमेदवार व शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मतदार संघात यावेळी उद्धव सेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

 मुबंई-शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जोगेश्वरीत आयोजित रोड शो ला जोगेश्वरीकरांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे महायुतीचे उमेदवार व शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मतदार संघात यावेळी उद्धव सेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

जोगेश्वरी पूर्व विधानसभेत शिवटेकडी ते आनंदनगर या मार्गावर हा रोड शो आयोजित केला होता.यावेळी उसळलेला प्रचंड जनसागर हाती मशाल घेऊन घोषणा देत होता, घोषणांनी संपूर्ण जोगेश्वरी पूर्व विधानसभा दुमदुमली होती. कीर्तिकर यांचे रोड शो चे स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले व त्यांचे औक्षण करून, हार घालून शुभेच्छा दिल्या. 

यावेळी शिवसेना नेते, माजी मंत्री अँड अनिल परब , शिवसेना नेते, आमदार सुनिल प्रभू , काँग्रेसचे नेते, व माजी मंत्री सुरेश शेट्टी , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस व अन्य मान्यवर नेते व पदाधिकारी व महाविकासआघाडीच्या सर्व महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

यावेळी अमोल कीर्तिकर म्हणाले की,प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांचे मिळणारे अपार प्रेम भावुक करणारे आहे. प्रत्येक आठवण मी हृदयात साठवून ठेवत असून हे क्षण निष्ठेने लढायला बळ देतात. निवडणूक जिंकल्यानंतरही आपल्या विकासासाठी वचनबद्ध आहे.