Join us

कोविडनंतर नाईट लाईफ पुन्हा सुरू करणार - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

मुंबई : कोविडचा धोका कमी होत असल्याने विविध निर्बंध शिथिल केले जात आहेत. लवकरच नाईट लाईफही पुन्हा सुरू करण्याचे ...

मुंबई : कोविडचा धोका कमी होत असल्याने विविध निर्बंध शिथिल केले जात आहेत. लवकरच नाईट लाईफही पुन्हा सुरू करण्याचे सूतोवाच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केले. मिशन बिगिन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या. यातील कोणताही व्यवहार परत बंद करण्याची वेळ आलेली नाही. रेस्टॉरंटही रात्री १ वाजेपर्यंत चालू आहेत. याच धर्तीवर नाईट लाईफही लवकरच सुरू करू, असे ठाकरे म्हणाले.

देशभरातील कोरोनाच्या एकूण रूग्णांमध्ये महाराष्ट्र आणि केरळचा वाटा ७० टक्के आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक दोन्ही राज्यात दाखल होत आहेत. यासंदर्भात ठाकरे म्हणाले की, केंद्रासोबत सद्य परिस्थितीवर चर्चा सुरु आहे. केंद्र आणि राज्य अशा स्तरावर नेहमी चर्चा सुरू असते. आमची जंबो कोविड सेंटरची संकल्पना त्यांनी घेतली. आम्ही देखील त्यांच्या संकल्पना घेत आहोत.

तर, एमटीडीसी आणि इतर हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत पार्टनरशीप करून उत्पन्नाचे साधन निर्माण करणार आहोत. मुंबईत विंटेज कार म्युझियम सुरू करणार आहोत. वरळीत हे म्युझियम असेल असे सांगतानाच मुंबई विद्यापीठाकडून राजाभाई टॉवरसाठी प्रस्ताव आल्याचे ठाकरे म्हणाले.