Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य पांचोलीला झटका, मारहाण प्रकरणात एक वर्षांची शिक्षा

By admin | Updated: November 5, 2016 17:36 IST

मारहाण प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीला न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मारहाण प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीला न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. मात्र आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देणार असल्याने तुर्तास त्याची जेलवारी टळली असून जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरील न्यायालयात अपील करेपर्यंत हा जामीन असणार आहे. 
 
आदित्य पांचोलीने 2005 साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीने आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला होता.