Join us
Daily Top 2Weekly Top 5

एडीजी प्रज्ञा सरवदे लोहमार्ग पोलीस दलाच्या प्रमुखपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:06 IST

संजय सक्सेना यांची विशेष अभियान विभागात नियुक्तीगृह विभागाचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण ...

संजय सक्सेना यांची विशेष अभियान विभागात नियुक्ती

गृह विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांची लोहमार्ग पोलीस दलाच्या प्रमुखपदी, तर संजय सक्सेना यांची विशेष अभियान विभागाचे अप्पर महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांचे बादली आदेश जारी करण्यात आले. रिक्त असलेल्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती केली जाते, याबद्दल मात्र अद्याप निर्णय झालेला नाही, त्याबद्दलची उत्सुकता कायम आहे.

प्रज्ञा सरवदे या १९८९च्या बॅचच्या अधिकारी आहेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ त्या पोलीस गृहनिर्माण विभागात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने संदीप बिष्णोई यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या लोहमार्ग विभाग अप्पर महासंचालक म्हणून बदली करण्यात आली. बिष्णोई यांना न्यायिक व तंत्रज्ञ विभागात संचालक म्हणून दोन दिवसांपूर्वी बढती देण्यात आली आहे. त्यांच्यासह नागरी सुरक्षा विभागात पदोन्नती करण्यात आलेल्या के. वेंकटेशम यांच्या विशेष अभियान विभागात संजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले वर्षभर ते प्रशिक्षणासाठी सुट्टीवर होते. काही दिवसांपूर्वी परतल्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

..........................................