Join us  

पुनश्च हरिओम... उद्यापासून एसटी महामंडळाच्या अतिरिक्त २५० बस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 5:26 AM

फिजिकल डिस्टन्सिंगवर भर । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सोय

मुंबई : मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून पंधरा टक्के उपस्थिती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी सोमवारपासून एसटीने अतिरिक्त २५० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बस पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावतील. यापैकी १४२ बस मंत्रालय, १५ बस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत. उर्वरित बस मुंबई महानगर प्रदेशांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाºया कर्मचाºयांसाठी धावतील. अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ४०० बस धावत आहेत. यामध्ये आणखी २५० बसची भर पडेल. या सर्व बस योग्य रीतीने सॅनिटाइझ केलेल्या असतील. प्रवासात फिजिकल डिस्टन्सिंगवर भर देत अन्य सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाºया डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई पालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी या सर्वांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेºया धावत आहेत.गरजेनुसार जादा बसची व्यवस्थासध्या दररोज सुमारे अत्यावश्यक सेवा बजावणाºया हजारकर्मचाºयांची सुरक्षित ने-आण एसटीच्या तब्बल ४०० बसेसद्वारेकेली जात आहे. गरज भासल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी आणखीजादा बसेस एसटीकडून सोडण्यात येतील, असे एसटीमहामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या