Join us  

मुंबईही प्रदूषणाच्या विळख्यात : बांधकामे, सतत वाढणा-या ई-कच-यामुळे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:05 AM

वाढती लोकसंख्या, वाहने, सतत वाढते औद्योगिकीकरण, पावलोपावली सुरू असलेली महाकाय बांधकामे, वाढत जाणारा ई-कचरा, यामुळे मुंबई शहरदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालले आहे.

कुलदीप घायवट मुंबई : वाढती लोकसंख्या, वाहने, सतत वाढते औद्योगिकीकरण, पावलोपावली सुरू असलेली महाकाय बांधकामे, वाढत जाणारा ई-कचरा, यामुळे मुंबई शहरदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालले आहे. सध्याच्या स्थितीत धूरकट बनलेल्या दिल्लीसारखी अवस्था मुंबईचीही नजीकच्या भविष्यात होऊ शकते, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वत: सजग राहून पर्यावरणाचे संरक्षण करावे, असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून दिला आहे.मुंबईत सर्वाधिक प्रदूषण वाहनांमुळे होते. वाहनांतून निघणाºया कार्बन डायआॅक्साइडमुळे प्रदूषणात भर पडते, तर बांधकामांमुळे सिमेंट, क्राँकिट, रेती याचे कण हवेत पसरतात. शहरातील व उपनगरातील धूलिकण, डम्पिंग ग्राउंडला सतत लागणाºया आगीमुळे निर्माण होणारे विषारी वायू हवेत मिसळत आहेत. या कारणांमुळे वातावरण धूरकट बनत आहे. त्यामुळे अनेकदा शहरासह उपनगरांमध्ये धुरके पसरलेले दिसून येते. या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांसह प्राण्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे, असे श्वसनविकार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.सध्यातरी मुंबईतील हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक आटोक्यात आहे. तथापि, दक्षिण मुंबई व मानखुर्द, अंधेरी, कुर्ला, भांडुप, गिरगाव, साकीनाका या भागांत कार्यालये मोठ्या प्रमाणात स्थापली गेली आहेत. त्यामुळे या परिसरांमध्ये महाकाय बांधकामे वेगाने सुरू आहेत, तसेच तेथे होणारी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ही शहर-उपनगरे अधिक प्रदूषित होत आहेत. डम्पिंग ग्राउंडमधील कचरा प्रक्रिया न करता टाकला जातो. त्यामुळे हवेतील दुर्गंधीचे प्रमाण वाढत चालले आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे आसपासच्या रहिवाशांचा श्वास गुदमरत आहे, तसेच बांधकाम, खोदकाम, सतत वाढणारी वाहने, यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अरबी समुद्रामुळे येणाºया नैसर्गिक वाºयांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात तरी राखली जात आहे, पण गगनाला भिडणाºया इमारतींमुळे व खुल्या जागांच्या अभावामुळे हवा अधिक खेळती राहण्यास समस्या निर्माण होत आहे. थंडीमध्ये अतिसूक्ष्म कण हवेच्या खालच्या थरात अडकून राहत असल्याने, थंडीच्या दिवसांमध्येही वायुप्रदूषणाचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.धूळ, मातीमुळे बनते धुरके-धुळीचे, मातीचे कण धुक्यामध्ये मिसळले जाऊन धुरके तयार होत आहेत. हे धुरके ढगासारखे बनून एकाच ठिकाणी साचते. त्यामुळे माणसांना श्वसनाच्या वेळी याचा त्रास होतो, तसेच काही स्थानिक भंगारवाले विजेच्या तारांमधून तांबे मिळविण्यासाठी तारा जाळतात. त्यामुळे काळ्या धुराचे लोळ आकाशात जमा होताना दिसतात.कशी आहेदिल्लीची अवस्था-जगातील प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचे नाव अग्रस्थानी आहे. देशाची राजधानी असलेली दिल्ली ‘प्रदूषणाचे शहर’ म्हणून सध्या ओळखली जाऊ लागली आहे. हिवाळ्यात जास्त धुके पडते व त्यात प्रदूषित वायू, धूलिकण मिश्रित होऊन धुरक्यांचे ढग तयार होऊन वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर पसरते. दिल्लीसह हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनाही सध्या प्रदूषणाने वेढले आहे.प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. प्रदूषित हवामानाचा फटका विमान आणि रेल्वेसेवांना बसत आहे. दिल्लीच्या प्रदूषणाने सर्व जण ग्रासलेले असून, त्यामध्ये सेलिब्रिटीदेखील आहेत. सर्व जण तोंडाला मास्क व रुमाल बांधून रोजच्या कामांसाठी बाहेर पडत आहेत.मुंबईत कडाक्याचे ऊन अन् थंडी-सध्या मुंबईकरांना दुपारी कडक उन्हाला तर रात्री बोचºया थंडीला सामोरे जावे लागत आहे. यामागची कारणे म्हणजे, मुंबईत लाखोंच्या संख्येने धावणारी वाहने, इमारतीचे अहोरात्र सुरू असलेले बांधकाम, पायाभूत सुविधांसाठी चाललेली खोदकामे, लघू व काही मोठ्या उद्योगांतून निघणारे वायू, काही ठिकाणातील सफाईअभावी रस्त्यांवर उडणारी धूळ, डम्पिंग ग्राउंड व अन्य ठिकाणी लागलेल्या आगीमुळे होणारे वायुप्रदूषण.

टॅग्स :प्रदूषणमुंबई