Join us

शासकीय कार्यालयाबरोबरच सोसायटय़ांमध्येही स्वच्छता अभियान

By admin | Updated: November 8, 2014 22:23 IST

डेंग्यी किंवा मलेरियासारख्या साथींचा फैलाव होवू नये याकरिता सिडकोकडून सार्वजनिक ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

पनवेल : डेंग्यी किंवा मलेरियासारख्या साथींचा फैलाव होवू नये याकरिता सिडकोकडून सार्वजनिक ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आता नवीन पनवेलमध्ये थेट सोसायटय़ांच्या आवारात जावून सफाई मोहिम राबविण्यात येणार आहे. याकरिता मिटकॉन आणि प्रियदर्शनी मंडळ आणि बांठिया विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहे.
मुंबईसह राज्यात डेंगीने थैमान घातले असून सिडको वसाहतीमध्येही डेंग्यीचे रुग्ण आढळले आहेत. या पाश्र्वभूमीवर सिडकोकडून विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: साचणारा कचरा त्वरीत उचलण्याच्या सूचना संबंधीत ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी डास प्रतिबंधात्मक औषध फवारणीचे कामही सुरू झाले आहेत. असे असले तरी मलेरियाच्या रुग्णांची संख्या अपेक्षेप्रमाणो कमी होत नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी साचले जाते. त्याचबरोबर गटार किंवा मल:निस्सारण वाहिन्या तुंबल्या गेल्याने डासांची उत्पती होती. आपले घर आणि आपले भले अशी मानसिकता फोफावली गेल्याने इमारतींच्या आवारातील स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून सोसायटय़ांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक संदीप पाटील यांनी प्रशासनाकडे मांडला. मिटकॉन आणि प्रियदर्शन कला व क्रिडा मंडळानेही याकरिता सकारात्मक प्रतिसाद दिला. सिडको प्रशासनाने या संकल्पनेला हिरवा कंदील दिला असून जनजागृतीकरिता बांठिया विद्यालयाची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक सोसायटय़ांमध्ये पत्रकही वाटण्यात येणार आहेत. 
 
च्14 नोव्हेंबर रोजी ही विशेष मोहिम सेक्टर 14, 17 आणि 18 मधील सुमारे 5क् पेक्षा जास्त सोसायटय़ांमध्ये राबवण्यात येणार आहे. 
च्ज्या ज्या ठिकाणी कचरा आहे तो उचलण्यात येणार आहे. त्याचबरोबर गवत वाढले असेल तर ते कटिंग मशिनने सोबत ठेवून कापून काढण्यात येईल. 
च्अभियानात सोसायटय़ांमध्ये राहणा:या रहिवाशांनी उस्फूर्तपणो सहभागी होण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे. 
 
च्मुरुड येथील नबाबकालीन लेडी कुलसूम बेगम रुग्णालयात महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तथा स्वच्छभारत अभियानाचे स्वच्छतादूत यांच्या o्री सदस्यांनी सुमारे दोन एकर परिसर काही तासांमध्ये स्वच्छ केला.
च्पावसाळी उगवनलेल्या वेली, गवत आदी काम 43 महिला व 2क् पुरुष यांनी अत्यंत मन लावून o्रमदान केले. 2/3 ट्रॉली कचरा व घाण स्वच्छ करून हास्पीटलचा परिसर स्वच्छ केला. o्री सदस्यांनी यापूर्वीही  o्रमदानाचे विविध कार्यक्रम राबविले आहेत. 
च्एल.के.बी. रुग्णालयाला अवकळा प्राप्त झाली होती. या रुग्णालयाची स्वच्छता व संपूर्ण रंगरंगोटी धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे यापूर्वीच केली आहे. तसेच नबाबकालीन गारंबी धरणातील गाळ उपसून धरणाची साठवण क्षमता वाढविली होती. 
 
कर्जत : कर्जत तहसील कार्यालयात शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कार्यालयातील कर्मचा:यांनी तहसील कार्यालय व आजुबाजुचा परिसराची स्वच्छता केली.
तहसील कार्यालयातील कर्मचारी आज सकाळी आठ वाजता कार्यालयात आले होते. तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार एल.के.खटके, महसुल नायब तहसीलदार अर्चना प्रधान, निवडणुक नायब तहसीलदार नालंद गांगुर्डे, पुरवठा अधिकारी दिनकर मोडक आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)